टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शहर शिवसेना प्रमुख रवी मुळे यांनी फिर्याद दिली आहे.शुक्रवारी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली वीज बील माफीच्या मागणीसाठी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते.
#पंढरपूर मध्ये #शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग . सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द #पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत #शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते pic.twitter.com/j8KIKetAZF
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 7, 2021
या आंदोलना दरम्यान भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष यांनी भाषण केले होते.त्यांनी भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शनिवारी समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद शहर व तालुक्यात उमटले.
त्यातूनच शनिवारी सायंकाळी शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी चांगलाच चोप ही दिला होता. या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शहर शिवसेनेचे अध्यक्ष रवी मुळे, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जयवंत माने, सुधीर अभंगराव, संदीप केंदळे, सिध्देश्वर कोरे यांनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांची भेट घेवून वादग्रस्त वक्तव्य करून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या.
या प्रकरणी शिरीष कटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदन दिले. त्यानुसार रात्री संशयित आरोपी शिरीष कटेकर यांच्या विरोधात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण पवार हे करीत आहेत. दरम्यान शनिवारच्या (कालच्या) घटनेनंतर शिरीष कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
भाजप नेते शिरीष कटेकर यांनी अनवधानाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करणे अपेक्षित असताना शिवसैनिकांनी कायदा हातात घेवून त्यांना मारहाण करणे योग्य नाही.
त्यांच्या कृतीचा भाजप म्हणून निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शहर भाजपचे अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिली आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारक या विषयी अधिक बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज