टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनी संत दामाजी नगर ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग मध्ये छत्रपती संभाजीराजे उड्डाणपूल व चौकाचे नामकरण करण्याचा ठराव करण्यात आला.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत संत दामाजी नगर ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांचे कौतुक केले.
त्यामुळे या ठरावाची तातडीने दखल घेत टोलनाक्या जवळील उड्डाणपुलाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव व या चौकाचे नामकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांच्या हस्ते टोलनाका परिसरामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर चांगलाच दणाणून गेला.
संत दामाजी नगर ग्रामपंचायतीने छत्रपती संभाजी राजे यांचे नाव उड्डाण पूल व चौकाला देण्याचा ठराव केल्यामुळे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी संत दामाजी नगर ग्रामपंचायतीचे कौतुक केले व आभार व्यक्त केले.
या उड्डाणपुलाला व चौकाला नाव दिल्यानंतर या भागातील परिसराचे सुशोभीकरण करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी उद्योजक सुशील आवताडे, सरपंच सुवर्णा वडितले, सोपान चव्हाण, जमीर सुतार, संजय जगताप, अॅड. दत्तात्रय तोडकरी, दिलीप माळी, दिलीप उगाडे, आप्पासाहेब वडतीले, विजय जाधव, कमलेश माळी, ग्रामसेवक गोरख जगताप, सतीश मोहिते, पप्पू वाडेकर, बंडू कोकणे, लक्ष्मण गायकवाड,
काका डोंगरे, आण्णा आसबे, गजानन शिंदे, बापू गायकवाड, नागेश चव्हाण , अमीर चाबुकस्वार, बाबर मिस्त्री, सचिन दत्तू, दोरकर, अविनाश गोवे, सर्जेराव धोत्रे, हनुमंत पवार, बाबा शिरसागर, अब्दुल सुतार, सागर जाधव, प्रमोद सावंजी आदी मान्यवर उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज