टीम मंगळवेढा टाईम्स ।
सन २०२१-२२ गळीत हंगामाकरिता शेतकरी सभासदांबरोबर मोलाचे सहकार्य करून साखर उताऱ्यात जिल्हयात दुसरा क्रमांक मिळवल्याने राज्यातील साखर कामगारांना त्रिपक्षीय समितीने जाहीर केलेली
१२ टक्के वेतनवाढ जानेवारी, २०२२ पासून श्री.संत दामाजी कारखान्याचे कर्मचाऱ्यांना लागु करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मागील सहा वर्षाच्या कालावधीत कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळास वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत कारखाना अडचणीत असताना सुध्दा चांगले गाळप होवू शकले.
दुष्काळी परिस्थिती, तांत्रिक व आर्थिक अडचणीमुळे जिल्हयातील आसपासचे कारखाने बंद राहिले.
परंतु संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांचे समजुतदारपणाचे धोरण व संस्था चालावी हा एकमेव उद्देश असल्याने मागील सहा वर्षात एकही हंगाम बंद ठेवावा लागला नाही.
कर्मचा – यांच्या दिलेल्या योगदानातून उतराई होण्याच्यादृष्टीने संचालक मंडळाने निर्णय घेवून १२ टक्के पगारवाढ माहे जानेवारी, २०२२ पासून लागू करण्यात आली असून माहे मार्च , २०२२ चा पगारवाढीसह पगार कर्मचा – यांच्या बँक खातेवर जमा केला असलेचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी पत्रकारांना सांगितले.
सन २०२१-२२ गळीत हंगामामध्ये हंगाम अखेर कारखान्याने १२४ दिवसामध्ये एकुण ३,८५ , ७०५ मे.टन गाळप करुन ३ , ९९ , ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे.
तसेच सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के असा मिळाला असून आपला साखर कारखाना सोलापूर जिल्हयामध्ये साखर उताऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला असलेची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश गणेशकर यांनी दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, वर्क्स मॅनेजर गणपत घाडगे, चिफ केमिस्ट मोहन पवार, मुख्य शेती अधिकारी रमेश पवार, पर्चेस ऑफिसर भारत निकम, कार्यालय अधीक्षक दगडू फटे, सिव्हील इंजिनिअर प्रविण मोरे, हेड टाईमकिपर आप्पासाहेब शिनगारे, स्टोअरकिपर उत्तम भुसे,
सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे , केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील , कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड व पदाधिकारी, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी व संचालक मंडळ, बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज