बाळासाहेब झिंजुरटे । बेकायदेशीर देशी दारूची विक्री करण्याच्या हेतूने चार जण अवैध दारू दुचाकीवर घेऊन निघाले होते.पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे कायदेशीर चौकशी करताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. ते पोलिसांना ढकलून देत शासकीय कामात अडथळा निर्माण करून पळून गेले.
ही घटना गुरुवार ( ता . २८ ) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सोनलवाडी ( ता . सांगोला ) येथे सोनलवाडी ते लोटेवाडी रस्त्यावर घडली . पोलिसांनी चंदनशिवे ( रा . शिरभावी , ता . सांगोला ) , अजय लोखंडे ( रा . माडगूळ ) व त्याच्यासोबत असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी पोपट भोसले यांनी सांगोला पोलिसात चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
Sangola: Pobara of four people transporting liquor
सांगोल्यात आजपासून दुकाने बंद
सध्या तालुक्यात परजिल्हा व परराज्यातून ( रेड झोन ) आलेल्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे.सांगोला शहरात खरेदी करण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांतून येणाऱ्या नागरिकांची होणारी गर्दी पाहता शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने शनिवार ( ता . ३० ) ते सोमवार ( ता . १ ) पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे.
Shops closed in Sangola from today
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील व्यापारी महासंघाने शहरात शनिवारपासून सोमवारपर्यंत सर्वत्र जनता कफ्यूँ पाळण्याचे ठरविले आहे . या तीन दिवसांत शहरातील फक्त अत्यावश्यक सेवा ( मेडिकल ) वगळता सर्व दुकाने बंद असतील
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज