टीम मंगळवेढा टाईम्स । शेतात मेंढरं चारण्यास सोडण्याच्या कारणावरून पुतण्याने चुलत्यास शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण केली . ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास शिंदेवस्ती,डोंगरगाव ता.सांगोला येथे घडली.
धुळा गणपत शिंदे रा.शिंदेवस्ती , डोंगरगाव ता.सांगोला हे स्वतःच्या शेतात मेंढरं चरण्यासाठी घेवून जात होते . त्यावेळी त्यांचा पुतण्या जगू महादेव शिंदे या देखील मेंढरं घेऊन जात असताना त्याची मेंढरं धुळा यांच्या शेतात आली होती. धुळा याने पुतण्या जगू यास तू तुझी मेंढरं माझ्या शेतात का सोडत आहे असे म्हणाले.
यावर जगू शिंदे याने धुळा यास शिवीगाळ , दमदाटी करत काठीने मारहाण केली . भांडणाचा आवाज ऐकून जगू याचा मुलगा सतीश हा तेथे येत त्याने धुळा यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी धुळा शिंदे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
In Sangola, his nephew beat his cousin with a stick
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज