टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे यादुष्ट हेतूने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मात्र त्यांच्या पायगुणाने राज्यात कोरोना आला.
मात्र दोन तारखेला या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार समाधान आवताडे विजयी तर होणारच आहे. शिवाय कोरोना आणि राज्यातील सरकारसुद्धा जाणार आहे, हे लिहून ठेवा असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केला
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे भाजपचे उमेदवार समाधान आवातडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना परिचारक यांनी वरील दावा केला.
या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी बाळा भेगडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, औदुंबर वाडदेकर, सोमनाथ आवताडे, गौरीशंकर बुरकूल, दीपक भोसले, शशिकांत चव्हाण, माजी सभापती प्रदीप खांडेकर,शिवाजी पटाप, बापू मेटकरी, जयंत साळे, राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप, पप्पू काकेकर, सचिन शिवशरण, प्रा.येताळा भगत, दत्तात्रेय जमदाडे उपस्थित होते.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रांजणी येथे बोलताना उपस्थित जनसमुदाय पाहून कोरोना या जगात नाही, यावर माझी खात्री पटली असून मीसुद्धा मास्क काढत आहे असे अजब विधान केले होते. त्याचा खरपूस समाचार आमदार परिचारकांनी घेत कोरोना नाही तर मग लाॅकडाऊन कशाला केला, असा सवाल उपस्थित त्यांनी केला.
विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत विजयदादा बाहेरचे आणि मी भूमिपुत्र हा मुद्दा रेटला गेला.विधानसभेच्या तीन निवडणुकीतील आमदार भारत भालके यांचे जनमत घसरत चालले आहे. मात्र, दीड लाख मतदार त्यांच्या विरोधात झालले आहे.
प्रत्येक वेळी 33 टक्के मत पडलेला उमेदवार पास होतो आणि 67 टक्के मते पडलेला उमेदवार नापास होतो, त्यामुळे या निवडणुकीत दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली जात आहे.
राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपूर मतदारसंघातून होणार आहे, त्यामुळे जनतेने विकासाच्या दृष्टीने समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. ही लढाई महाविकास विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अशी आहे. राज्यातील एकमेव निवडणूक असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे भाजपचे उमेदवार समाधान आवातडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना परिचारक यांनी वरील दावा केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज