मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढयाचे नुतन आमदार समाधान आवताडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आज गुरुवार दि.९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. मारुतीच्या पटांगणात आयोजित केला असल्याची माहिती सजग नागरिक संघाचे अॅड.भारत पवार यांनी दिली.
नुतन आमदार समाधान आवताडे यांचा नागरी सत्कार ह.भ.प.अॅड.जयवंत बोधले महाराज (धामणगावकर) यांच्या हस्ते तसेच धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन सजग नागरीक संघ, व्यापारी महासंघ व समस्त मंगळवेढा तालुकावासियांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
मंगळवेढा तालुक्यास प्रदिर्घ काळानंतर भुमीपूत्र आमदार मिळाला असल्यामुळे तालुक्यामध्ये चैतन्याचे वातावरण असून या सत्काराच्या निमित्ताने तालुक्यातील विविध प्रश्न म्हणजेच पाणी,
पर्यटन विकास, प्राथमिक शिक्षण, आरोग्य व क्रीडा या क्षेत्रामध्ये मूल पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने व इतर विकासाच्या दृष्टीने आगामी पाच वर्षासाठी एक प्रत्यक्ष कृती आराखडा तालुक्यातील विविध स्वयंसेवी संघटनांच्यावतीने तयार करावयाचा व त्याची अंमलबजावणी करावयाची असा संकल्पही यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
असे माजी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजीत जगताप व अॅड. भारत पवार यांनी सांगितले. व सदर नागरी सत्कारास तालुक्यातील सर्व नागरिकांनी हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरचा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, व्यापारी महासंघाचे अरूण किल्लेदार, सजग नागरिक संघाचे संजय कट्टे, कृषीभूषण अंकुश पडवळे, नवउदयोजक प्रतिक किल्लेदार,
माजी जिल्हा शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, माजी गट शिक्षणाधिकारी हणमंतराव कोष्टी, प्रा. विक्रांत पंडीत, अॅड. दत्तात्रय खडतरे आदीजण प्रयत्नशील आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज