मंगळवेढा टाइम्स न्युज।
मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
सभापती पदासाठी सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या दीपाली ताड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, उपसभापती पदासाठी अर्जुन मल्लाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आमदार समाधान आवताडे यांचा मास्टरस्ट्रोक: पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी दीपाली ताड यांना संधी देऊन महिला नेतृत्वाला बळ दिले आहे.
अंतिम क्षणी निर्णयावर शिक्कामोर्तब:
अनेक नावे चर्चेत असताना, आमदार समाधान आवताडे यांनी दीपाली ताड यांच्या निष्ठेवर आणि कामावर विश्वास दाखवत त्यांचेच नाव निश्चित केले.

सभापती पदी दीपाली ताड आणि उपसभापती पदी अर्जुन मल्लाळे या नव्या जोडीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

”मंगळवेढा तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे नवे नेतृत्व सक्षमपणे काम करेल,” असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











