टीम मंगळवेढा टाईम्स।
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवाची तातडीची बैठक आज रविवार १० मार्च २०२४ रोजी शासकीय विश्राम गृह, सात रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत समाजाची भूमिका काय असणार याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले.
या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका ठरविण्यात येणार असून सगे सोयरे या शब्दासह ५० टक्के च्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून सरकार वर दबाव टाकण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
नुकताच मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीत निवडणुक आयोगाला कोंडीत पकडण्यासाठी वेगळी रणनिती आखण्याबाबत सुतोवाच केले होते. शिवाय निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तेच कागद चिटकवायचे.
आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका सभेत नुकतेच समाजाला आवाहन केले तसेच सरकारवर निशाणा साधला होता. या सर्व बाबींवर आज होत असलेल्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे सकल मराठा समाजाने सांगितले आहे.
आज या बैठकीत सर्व समाज बांधवांचे विचार ऐकून एक सर्व समावेशक धोरण ठरविण्यासाठी सर्व समाज बांधवांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज