टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षानेच प्रचाराचा धडाका लावायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भोरमध्ये जाहीर सभा घेतली.
या सभेत शरद पवारांनी त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या नावाची महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषणा झाली. भोरमधील सभेत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली.
बारामती लोकसभेसाठी दोन्ही पवार गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.
शरद पवारांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांच्या भोरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. थोपटेंसोबत असलेला संघर्ष मिटवण्यासाठी जाणीवपूर्वक भोरमध्ये पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.
सुप्रिया सुळे उमेदवार
तुमच्या सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुप्रियाची उमेदवारी देत आहोत. तुम्ही सगळ्यांनी तिला तीनदा निवडून दिलं. काम करणाऱ्यांमध्ये पहिल्या दोन-तीन क्रमांकाचे खासदार आहेत, ज्यांचा लौकिक आहे त्यात तुमच्या उमेदवाराचा नाव लौकिक आहे’, असं म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं.
मोदींच्या गॅरंटीवर टीका
‘मोदींची गॅरंटी म्हणतात, कसली गॅरंटी? त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा पैसा आहे, तो काळा पैसा मी आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन. एक दमडा परदेशातून आणला नाही.
पाच-पन्नास देशांमध्ये चकरा टाकल्या, त्या देशात आपण त्याचे महत्त्वाचे घटक आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्यांना संपन्न करण्याचं धोरण त्यांनी सांगितलं होतं, त्याची अंमलबजावणी केली नाही’, अशी टीका शरद पवारांनी केली.
मोदीजी सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करायचा असतो. केवळ उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी नाही. त्यांच लक्ष फक्त गुजरातकडे, त्यासाठी बाकीची राज्य संकटात नेत आहेत.
तुम्ही राज्याचे पंतप्रधान होता देशाचे नाही, असंच करायचं असेल तर त्यांचा पराभव करावा लागेल. हजारोंच्या संख्येने तरुण वणवण फिरत आहेत. तरूणाची शक्ती वाया घालवण्याचं काम करत आहेत’, असा आरोप शरद पवारांनी केला.
‘सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते आज ती सत्ता लोकांना त्रास देण्यासाठी वापरतात. राऊत साहेबांना अटक केली महिने तुरूंगात ठेवलं. सत्तेचा गैरवापर करून अनिल देशमुखांना वर्षभर तुरूंगात टाकलं’, अशी टीकाही शरद पवारांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज