टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तहसील कार्यालय अंतर्गत महसूल पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून आज दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भोसे गावातील शहीद जवान सुधीर घाडगे स्मारक जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित केलेला आहे.
याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदार मदन जाधव, भोसे मंडळाचे मंडळ अधिकारी कैलास शिंदे, भोसे तलाठी विकास माळी, तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष मा.रोकडे व मा.माळी या सर्वांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदरचा कार्यक्रम शहीद जवान सुधीर घाडगे यांच्या स्मारकाला अभिवादन करून सुरुवात होणार आहे.
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम आज भोसे गावात राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांर्गत महसूल संबंधित समस्यांचे निराकरण करता येणार आहे. मंगळवेढा तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागामध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुंटूंबिंयाना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सैनिकांना येणाऱ्या अडचणी तक्रारीबाबतची माहिती इत्यादी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व विषयाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
भोसे मंडळ येथील व तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी शासन योजनांची अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा.
तसेच, लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
मंडळ अधिकारी कैलास शिंदे, भोसे तलाठी विकास माळी, हुन्नूर तलाठी सतीश जगताप, लोणार तलाठी विजय पानबुडे,रेड्डे तलाठी सुयश आलदर, मारोळी तलाठी प्रतापसिंह घुनावत, महमदाबाद (हु) तलाठी संतोष बजबळकर, शिरनांदगी तलाठी अशोक मगदुम परिश्रम घेत आहेत.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोसे मंडळातील सर्व तलाठी कोतवाल व पोलीस पाटील परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज