टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्यावर्षी मंगळवेढा येथे झालेले राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन अप्रतिम असे झाले. यावर्षीही मान्यवरांच्या सहभाग या संमेलनामध्ये असल्याने दुसरे संमेलनदेखील अप्रतिमच होईल असा विश्वास माजी पालकमंत्री तथा राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाचे संयुक्त अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला.
सुरसंगम म्युझिकल ग्रुप, म.सा.प.शाखा दामाजीनगर व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने याहीवर्षी राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन हे ऑनलाईन घेण्यात येणार असून या संमेलनाच्या पत्रिकेचे प्रकाशन प्रा.ढोबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ढोबळे म्हणाले,महाराष्ट्रातील नामवंत व जेष्ठ असे साहित्यिक, कलावंत यासोबत गोवा व कर्नाटकातील ही मान्यवरांचा यंदाच्या संमेलनात सहभाग असल्याने या संमेलनाला चार चाँद लागणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात खरा साहित्यिक व सच्चा कलावंत यांचा कोंडमारा होवू नये. त्यांचेत असलेला कलावंत जीवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या व्यासपीठाची गरज होती. ही गरज संयोजकांनी पुर्ण केली असून सलग दोन दिवस या राज्यस्तरीय अशा संमेलनाचा आनंद सर्वांना घरबसल्या घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार, संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.सुजित कदम, संयोजक तथा म.सा.प. दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम, सुरसंगम म्युझिकल ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, डॉ.शरद शिर्के यांचेसह यतिराज वाकळे, अॅड.विनायक नागणे, रामेश्वर मासाळ, अॅड. सचिन गोसडे आदि उपस्थित होते.
The second Sahitya Sangeet Sammelan will also be amazing: Prof. Laxmanrao Dhoble
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज