टीम मंगळवेढा टाईम्स।
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केलं आहे. ही सभा आज दुपारी 12 वाजता होणार आहे. सभेसाठी हजारो लोक जमले असून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राने पाहिली नसेल अशी सभा अंतरवली सराटीत आज होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ही सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी राज्यातील 123 गावांनी आर्थिक मदत केलीय.
तनमनधनाने गावकरी या सभेसाठी राबत आहेत. या सभेसाठी कालपासूनच लोक अंतरवली सराटीत दाखल झाले आहेत. सभेसाठी आलेल्या लोकांनी अख्खी रात्र जागून काढली आहे. आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी हे लोक एकवटले आहेत. कुणबी असल्याचं सरसकट प्रमाणपत्र मिळावं हीच या सर्वांची मागणी आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे सभेचं आयोजन केलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे
आणि ही सर्व व्यवस्था छत्रपती संभाजीनगरचे जाधव मंडप डेकोरेशनचे मालक रखमाजी जाधव यांनी केवळ समाजाचे देणं लागतं म्हणून मोफत केली आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेच्या ठिकाणी काल डॉग स्कॉड कडून सुरक्षा तपासणी करण्यात आली. या सभेला सुमारे सात लाख लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ही पहिलीच आणि सर्वात मोठी सभा ठरणार आहे.
अंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावरील 150 एकर जागेवर ही सभा होणार आहे. यासभेसाठी 15 फूट उंच स्टेज बांधला आहे. सभेत मनोज जरांगे पाटील यांची ग्रँड एन्ट्री होणार आहे. त्यांच्या एन्ट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प बनवला आहे. स्टेजच्या चारही बाजूला जरांगे पाटील संवाद साधतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी असणार दिवसाची सुरुवात
मनोज जरांगे हे सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून दिवसाची सुरुवात करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत जरांगे आंदोलन स्थळी बसून राहणार आहेत. 1
1 वाजता ते सभास्थळावरून शक्ती प्रदर्शन करत उघड्या जीपमधून सभेच्या ठिकाणाकडे जाणार आहेत. सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रॅम्पवॉक करून मनोज जरांगे हे मंचावरती दाखल होतील. साधारणपणे एक तास भर ते भाषण करतील.
सभेची वैशिष्ट्ये
आज दुपारी 12 वाजता अंतरवली सराटीमध्ये सभेला सुरुवात होणार, 150 एकर मैदानावर सभा होणार, सभेची तयारी पूर्ण, सभेसाठी 15 फूट उंचीचा स्टेज उभारण्यात आलाय
स्टेजवरून चारही बाजूने संवाद साधता येईल अशी व्यवस्था केलीय, मनोज जरांगे यांच्या एन्ट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प बनवलाय, सभेसाठी तब्बल 600 भोंग्याचा वापर, 5 हजाराहून अधिक स्वयंसेवक सभेची तयारी करत आहेत
20 हजार स्वयंसेवक सभास्थळी दाखल, 10 लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था, 123 गावांनी ही सभा आयोजित केलीय, सभेसाठी 31 गावांनी निधी उभारला. कुणी 500 रुपये दिले तर कुणी हजार
23 गावातील 31 गावांच्याच लोकांच्या खर्चात सभा होणार, उर्वरित गावांचे पैशांची गरज पडली नाही. चार ठिकाणी 100 एकरवर पार्किंगची व्यवस्था, सभेसाठी आजपासून धुळे-सोलापूर मार्ग बंद, जालन्यात 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज