mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आरटीओ चा दंड आता ई-चलनाद्वारे भरता येणार; आता दंड भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आरटीओ चा दंड आता ई-चलनाद्वारे भरता येणार; आता दंड भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

 


टीम मंगळवेढा टाईम्स । वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक रक्कम भरण्यासाठी आरटीओ कडे  ‘ई-चलन मशिन’उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारा वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा नियमभंग केला आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मशिनद्वारे थेट केलेल्या कारवाईअंतर्गत दंडाची पावती थेट वाहनचालकाच्या मोबाइलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली जात असल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली आहे.

दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ च्या दोन भरारी पथकाकडून आठ दिवसात ७५ चलनाद्वारे तब्बल ५ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक तानाजीराव धुमाळ यांनी दिली.


रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने १ सप्टेंबर पासून नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर आरटीओकडून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जिह्यात दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यानुसार  बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.भरारी पथकातील मोटार वाहन निरीक्षक तानाजीराव धुमाळ, मोटार वाहन निरिक्षक आशिष पाराशर  ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे यांनी  कारवाई ची मोहीम तीव्र केली आहे.

या आठ दिवसात तब्बल ५ लाख ६७ हजार रुपये ई चलनाद्वारे दंड वसूल करण्यात आला आहे.

 


नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून या ई चलन  मशिनद्वारे  दंडाची रक्कम आकारण्यात येत आहे. ती भरल्यानंतर त्याला लगेच पावती देण्यात येते. दंड वसूल करण्याचे ठिकाणही या मशीनमध्ये नमूद होते.वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ऑनलाइन कारवाई करणे, वाहनाचे छायाचित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर करणे, दंड कपातीची माहिती वाहनचालकाच्या मोबाइलवर एसएमसद्वारे पाठविणे, दंड जागेवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता यावा म्हणून स्वाइप मशिन्स, पेंडिंग दंडाबाबत वाहनचालकाला ऑनलाइन पेमेंट सुविधा, कार्यालयात येऊन दंड भरण्याची सुविधा आहे.

तसेच वाहनचालकाची सर्व माहिती ई-चलनामुळे आरटीओ कडे राहणार आहे. कारवाई दरम्यान वाहनचालक पसार झाला, तर त्याचा वाहन क्रमांक, मोबाइल क्रमांक घेऊन चलन करून तर थेट वाहनमालकाला कारवाईबाबत मेसेज जाईल.

त्यानंतर मालकाला दंड भरावा लागेल. एकदा केलेले चलन कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही. वाहनचालक, मालकांना दंड न भरल्यास त्यांच्या नावावर दंड न भरलेली रक्कम दिसेल. पुढील कारवाईच्या वेळेस  पकडल्यानंतर जुन्या दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर वाहन सोडून दिले जाणार आहे.

एका शहरात केलेला दंड, दुसऱ्या शहरातही वसूल करता येणार आहे अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक तानाजीराव धुमाळ यांनी  दिली.

वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर वेळीच सावध राहा अन्यथा तुम्हाला आरटीओ च्या  कारवाईला सामोरं जावे लागणार आहे.

नव्या कायद्यानुसार गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक , विना इन्शुरन्स गाडी चालवणे,  मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत दहापट दंड आकारण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना दंडाची रक्कम भरण्यास सोलापूर येथील कार्यालयात जाण्याची गरज नाही ते संबंधित आरटीओ कडे असणाऱ्या ई चलन मशीनवर भरू शकतात.

घरबसल्या मिळणार माहिती

अनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे. त्यामुळे आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल इंटरनेटवरून मिळवू शकता. डिजिटल इंडियामुळे अनेक सरकारी कामे ऑनलाइन होत आहे. त्यामुळे याबाबतच्या समस्या आणि तक्रारीचं निवारण करण्यासाठी आरटीओची अधिकृत वेबसाईट आहे.

यामध्ये echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वाहनावर किती दंड जमा आहे हे तपासू शकता. वाहन नोंदणीवेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे मॅसेज येत असतात. 

नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या रेकॉर्ड ची होणार तपासणी


ई-चलन मशिन’वर नियमभंगाची माहिती साठवली जाणार आहे. त्यामुळे एखादा वाहनचालक नियमभंग करताना आढळल्यानंतर त्याचे रेकॉर्ड तपासले जाणार. पूर्वी ची दंडाची रक्कम भरून घेतली जाणार आहे. वाहन चालकाकडे एटीएम कार्ड असल्यास त्यावरून स्वॅप करून रक्कम घेतली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना दंड भरण्यासाठी आता सोलापूर येथील कार्यालयाकडे जाण्याची गरज नाही.  आरटीओ कडे  ‘ई-चलन मशिन’उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून एटीएम कार्ड व ऑनलाइन च्या माध्यमातून दंडाची रक्कम भरण्यात येणार आहे त्याची पावती ही जाग्यावर दिली जाणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय  डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली  दोन भरारी पथकानी आठ दिवसात ७५ ई चलनाद्वारे  ५ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तानाजीराव धुमाळ, मोटार वाहन निरीक्षक सोलापूर  


RTO fines can now be paid through e-challan;  No need to go to the office to pay the fine anymore

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली; ‘या’ तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली; 'या' तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा