मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा तालुक्यातील पायाभूत सुविधांची पूर्तता व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, रस्ते विकास, शिक्षण, कृषी, घरकुल योजना, विहीर योजना तसेच पंचायत समिती अंतर्गत व प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

ही बैठक उद्या शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात आली आहे.

या आढावा बैठकीत मंगळवेढा तालुक्यातील सर्व पंचायत समिती गणांमधील नागरिकांच्या अडी-अडचणी, प्रलंबित कामे तसेच

शासकीय कामकाजातील अडथळ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.

दरम्यान, ज्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या असतील, त्यांनी त्या लेखी स्वरूपात आज गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ), पाणीपुरवठा अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, घरकुल विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय योजनांचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














