mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खडीक्रशर व दगड खाणपट्ट्याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2023
in सोलापूर
आता मुंबईला जाण्यासाठी इंदापूरऐवजी अहमदनगरला वळसा घालावा लागणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

खडीक्रशर व दगडखाणपट्टयाचा विषय राष्ट्रीय हरित लवादाच्या क्षेत्रात असून, न्यायालयीन प्रकरण असल्याने खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण अनुमती शिवाय कोणत्याही प्रकारचे उत्खनन करू नये, अशा प्रकारे देण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करून मुकुल रोहितगी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून हरित लवादाच्या या निर्णयाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने याचिका दाखल करून स्थगिती घेण्यात आली आहे.

तथापि आज रोजी अल्पमुदतीचे गौण खनिज परवाने घेऊन उत्खननाची कार्यवाही करावयाची असल्यास ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजरमधील तरतुदींचे पालन करूनच उत्खनन करण्याबाबत शासन स्तरावरूनही निर्देश देण्यात आलेले आहेत.

व पर्यावरणाच्या अनुमतीच्या व इतर सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करून खाणपट्टा आणि क्रशर अशा प्रकारचे उद्योग केल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना खाणपट्टा धारकांना सामोरे जावे लागणार नाही व भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या कारवाया टाळण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक कायदेशीर बाबींचे पालन करणे महत्त्वाचे असल्याची गरज श्री.विखे पाटील यांनी यावेळी प्रतिपादित केली

खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी यांनी केलेल्या विनंतीनुसार नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.

यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे , राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा गौण खनिज अधिकारी दिव्या वर्मा आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी खाणी पुन्हा सुरू करण्याची अनुमती देण्याची व दंड माफ करण्याची मागणी केली.

तसेच, रॉयल्टी भरण्याची तयारी दर्शविली. तसेच अन्य जिल्ह्यांप्रमाणे अल्प मुदत 500, 1000, 2000 ब्रास खनिज उत्खनन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्यायालयीन प्रकरण असल्याने खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले.

तसेच, शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अन्य जिल्ह्यांनी दिलेल्या अल्पमुदतीच्या गौण खनिज परवाना प्रक्रिये बाबत अन्य जिल्ह्यांनी काढलेल्या परिपत्रकाचे तसेच निर्गमित केलेल्या आदेशांचे आणि परवानग्यांचे अवलोकन करून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पुढील कार्यवाही करावी, असे सांगितले.

तसेच खाणपट्टा धारकांनी लवकरात लवकर सर्व प्रकारच्या अटींची पूर्तता करून पर्यावरणविषयक परवानग्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते प्रयत्न करावेत असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खडी क्रशर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

विठ्ठला! पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात; मग पायी वारी का नको? शासनाने पुनर्विचार करावा

Breaking! पंढपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात ‘या’ गोष्टीवर असणार बंदी; आदेश जारी

March 28, 2023
चिंता वाढली! सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक; ग्रामीणमध्ये संशयितांच्या चाचण्या अत्यल्प

नागरिकांनो! कोणतेही लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या; कोणताही आजार अंगावर काढू नका; आरोग्य विभागाचे आवाहन

March 28, 2023
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

खुशखबर! कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार ‘इतके’ अनुदान; मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना येथे अर्ज करता येणार

March 27, 2023
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

आता अवघ्या ‘इतक्या’ हजारात मिळणार घरपोच एक ब्रास वाळू; शासनाची वाळू डेपो निर्मिती; वाळू माफियांना सरकारी चपराक

March 27, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 27, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

March 26, 2023
चिंता वाढली! सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक; ग्रामीणमध्ये संशयितांच्या चाचण्या अत्यल्प

चिंता वाढली! सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक; ग्रामीणमध्ये संशयितांच्या चाचण्या अत्यल्प

March 23, 2023
Next Post
मंगळवेढा शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुदगूल, काकडेंना; ज्येष्ठ मंडळीच्या पुढाकाराने तिढा सुटला!

मंगळवेढा शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुदगूल, काकडेंना; ज्येष्ठ मंडळीच्या पुढाकाराने तिढा सुटला!

ताज्या बातम्या

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

March 29, 2023
खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

March 29, 2023
Breaking! मंगळवेढा शहरातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

संतापजनक! विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

March 29, 2023
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

चुकीला माफी नाही! चेक बाऊन्स प्रकरणी मंगळवेढ्यातील ठेकेदारास 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा

March 29, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा