सेवानिृत्त महिला पोलीस निरीक्षकाने एका महिला पोलीस उपनिरक्षकाला चावल्याची घटना पंढरपूर पोलीस ठाण्यात घडली आहे.
कायदेशीर कामात अडथळ आणल्याप्रकरणी सेवानिवृत्त महिला पोलीस निरक्षक वंदना उत्तम शिरगिरे व कुणाल उत्तम शिरगिरे (दोघे रा. हरिपुजा रेसिडेन्सी, वाखरी, पंढरपूर) यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोर्टी रोडने येणारी वाहतूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाजूने वळवण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी काम करत होते. या दरम्यान एम.एच. १३ डि इ ६९४४ ही कोर्टी रोडने येऊन रेल्वे पुलाच्या खाली निघाली. यावेळी त्याठिकाणी काम करत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी कविता चोपडे यांनी त्या कारला थांबवले.
रस्त्याचे काम चालु असल्याने रस्ता बंद असल्याचे चोपडे यांनी कार चालकाला सांगितले. त्यावेळी तो कार चालक मी याच रोडने जाणार पर्यायी रोडने जाणार नाही. तुम्हाला कोणी आदेश केला. त्या अधिकाऱ्याला येथे बोलावून घ्या. मी तुमची वरपर्यंत तक्रार करणार असे म्हणून कार चालकाने पोकॉ.कविता चोपडे यांच्याशी हुज्जत घातली.
या दरम्यान चोपडे त्या व्यक्तीला रहदारीचे नियम समजून सांगत होत्या. त्यावेळी त्याच्या बाजूला बसलेली महिलाही हुज्जत घालू लागली. तसेच रोडवरील बॅरिकेटींग खाली पाडून कार आडवी लावून रोड बंद पाडला.त्यामुळे त्याठिंकाणी वाहतूक ठप्प झाली.
त्यामुळे कविता चोपडे यांनी पोलीस सहाय्यक निरीक्षक मनीषा महाडीक व पोलीस कर्मचारी सोनाली इंगोले यांना बोलावून घेतले. त्या महिलेला शहर पोलीस ठाण्यात नेहण्यात आले. यावेळी तिने तिचे नाव वंदना उत्तम शिरगिरे असे आहे. कार चालक माझा मुलगा आहे. मी सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक आहे.
तसेच महाडीक यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला दाताने चावली. तसेच पोलीस कर्मचारी सोनाली इंगोले यांना नकाने ओरखडे घेतले. यामुळे वंदना उत्तम शिरगिरे व कुणाल उत्तम शिरगिरे यांच्याविरुध्द भादविक ३५३, ३३२, ३२४, ३४१, ३२३, ५०६, ५०६, २६८, २६९, ३४ प्रमाणे पोकॉ. कविता चोपडे यांनी तक्रार दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज