मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मान्यतेविना दारू दुकानाला परस्पर मंजुरीचा ठराव दिल्याप्रकरणी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे.
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील ग्रामसेवक संतोष पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
पेनुर येथील ग्रामसेवक संतोष पाटील यांनी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मद्य विक्री दुकानाला मंजुरीचे ठराव दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
त्याचबरोबर ग्रामसेवक पाटील यानी १४ वा वित्त आयोग निधीमधून नियमबाह्य रक्कम काढून खर्च केल्याचा आरोप राजगुरू यांनी केला होता. या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला होता.
ग्रामसेवक पाटील हे पेनुर येथे कार्यरत असताना सन २०१८ ते २०२० कालावधीमध्ये मद्य विक्री दुकानासाठी चुकीची कागदपत्रे दिलेचे या अहवालात नमूद करण्यात आले होते.
अनियमित कामकाज, आर्थिक अनियमितता व गैरशिस्तीचे वर्तनाबद्दल त्यांना निलंबित करणेत येवून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. मद्य परवान्याच्या बाबतीत उत्पादन शुल्क विभागालाही कळवण्यात आले होते.
गट विकास अधिकाऱ्याच्या अहवालावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी ग्रामसेवक संतोष पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या विभागीय चौकशीचा ग्रामसेवक पाटील हे पेनूर येथे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
दोन दिवसात दोन ग्रामसेवक निलंबित
दोन दिवसापूर्वी माढा तालुक्यातील बिटरगाव येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाने अपहार केल्याच्या प्रकरणात एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाला बसावे लागले. या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक ए. एस. कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज