टीम मंगळवेढा टाईम्स । लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर आता सिंहगड रोडवरील नांदेड फाटा परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नांदेड फाटा परिसरातील जिजाई नगर, कोरडे बाग येथील एका 55 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकही दिवस घराच्या बाहेर न पडलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली कशी ? हे शोधण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.(The report of a woman from Nanded Fata area in Pune is positive)
ताप व श्वास घ्यायला त्रास जाणवत असल्याने सदर महिलेला तपासणीसाठी नऱ्हेगाव येथील नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या महिलेची कोरोना चाचणी केली असता शनिवारी रात्री सदर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती हवेली तालुका गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून देण्यात आली.
या महिलेच्या घरातील सहा व्यक्तींना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, इतर पाच व्यक्तींना होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले असल्याचे खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून सांगण्यात आले.
नांदेड फाट्यावरील ज्या भागात रुग्ण आढळला आहे, येथील परिसर हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी ग्रामविकास अधिकारी नवनाथ झोळ व नितिश लगड यांच्या मदतीने सील केला आहे. नांदेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज