मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
महिन्याला पाच टक्के मूळ रक्कम व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचा बहाणा करून
एका कंपनीच्या फसवणुकीला पुण्यासह राज्यातील हजारो लोक बळी पडले आहेत. बाणेर रस्त्यावरील एपीएस या खासगी शेअर मार्केट कंपनीत २०११ पासून लोक गुंतवणूक करीत होते.
दोन आठवड्यापूर्वी परतावा घेण्यासाठी काही लोक कंपनी कार्यालयाकडे गेले होते. त्यावेळी कंपनीचे कार्यालय कुलूपबंद होते. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश अर्जुन राठोड असे फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीत पुण्यासह राज्यातील अनेक लोकांनी पैसे गुंतविले आहेत.
गेल्या वर्षभरातच हा आकडा सुमारे ७०० कोटी असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २०११ पासून या कंपनीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करण्यात आली.
या कंपनीकडे पुण्यातील अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. सुरुवातील आरोपी राठोड यांना गुंतवणूकदारांना छोटे-मोठे परतावे दिले. वर्षभरामध्ये त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणत गुंतवणूक झाली होती.
दरम्यान, त्याने विविध कारणे सांगून परतावे देण्याचे टाळल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. आतापर्यंत आरोपी राठोड याने गुंतवणूकदारांची ७०० कोटींची रक्कम जमा केली. आता ती रक्कम घेऊन आरोपी पसार झाला आहे.
सुरुवातीला दिलेल्या परताव्यामुळे नागरिकांचा आरोपीवर विश्वास बसला होता. त्यातून मिळालेल्या तोंडी प्रसिद्धीमुळे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली होती.
या वर्षभरात कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. दामदुप्पट मिळत असल्याने काही नागरिकांनी कोटीमध्ये रक्कम गुंतविली आहे. हा आकडा सुमारे ७०० कोटींचा असल्याची माहिती आहे. आता कंपनीचे कार्यालय बंद असल्याने अनेकांची जीवनभराची पुंजी लुटली गेल्याचे समोर आले आहे.
बार्शी’ची पुण्यात पुनरावृत्ती
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात सुमारे दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. शेअर बाजारात गुंतवणूक करून दामदुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली होती.
या प्रकरणात विशाल फटे या कंपनी चालवणाऱ्या तरुणाला अटक झाली होती. त्या प्रकरणात फटे अद्यापही जेलमध्येच आहे. पुण्यात झालेल्या या नव्या घोटाळ्यातदेखील दरमहा १० टक्के रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधीची फसवणूक झाली आहे.(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज