टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ एनसीसीएफ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.11 फेब्रुवारी पासून
तूर हमीभाव खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नाव नोंदणीची मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालय मध्ये सुरुवात सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांनी दिली.
या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुका व इतर तालुक्यातील सर्व तूर उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयाचे विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर आणावयाची आहे.
त्यानंतर विक्री केलेल्या तुरीची रक्कम ऑनलाइन शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे. चालू वर्षी तूर या धान्यासाठी आधारभूत किंमत 7550 रुपये आहे.
नोंदणीसाठी सन 2024-25 च्या तूर पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँक पासबुक ती स्पष्ट दिसत असणारे झेरॉक्स व मोबाईल नंबरची आवश्यकता आहे.
खरेदी केंद्राच्या अधिक माहितीसाठी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभू नागणे मोबाईल नंबर 9405214595 व मच्छिंद्र कोंडूभैरी 9890831934 यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन संस्थेचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज