टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 839 पैकी 67 प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे.
दरम्यान, दाखलपूर्व प्रकरणामध्ये एक कोटी, 51 लाख, 40 हजार 916 रू.इतकी वसुली झाली आहे.
मंगळवेढा येथे न्यायाधीश एस. एन. गंगवाल-शहा यांच्या अध्यक्षातेली व न्यायाधीश पी. पी. बागुल व न्यायाधीश आर. एम.देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच राष्ट्रीय लोक अदालत पार पडले.
यामध्ये दिवाणी व फौजदारी असे एकूण 839 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 67 प्रकरणे निकाली काढण्यात त्यांना यश आले आहे.
दाखलपूर्व प्रकरणात बँक व ग्रामपंचायतकडील 4119 प्रकरणे प्राप्त होती. त्यापैकी 19 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
दरम्यान यामध्ये 16 लाख 60 हजार 280 रुपये वसुल प्राप्त झाला आहे. पॅनलवर अॅड.सागर टाकणे, अॅड.जी.डी.चव्हाण यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लोकअदालतसाठी न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज