टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान योजनेतील अपात्र लोकांकडून आत्तापर्यंत १० लाख ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले असून अद्यापही १ कोटी ३६ लाख १४ हजार रुपये वसूल करणे बाकी असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली अभिनव योजना आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत असल्याने या पैशातून आधार मिळत असतानाच संपूर्ण देशात अनेक ठिकाणी बोगस लाभार्थ्यांनी या योजनेत सहभागी होवून पैसे उचलल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या योजनेत आयकर भरणाऱ्यांचाही समावेश असल्याने संपूर्ण चौकशी अंती स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ७२८ आयकर भरणाऱ्या खातेदारांचा योजनेत समावेश झाल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे.
त्यांच्याकडून ७१ लाख ६८ हजार रूपयापैकी १० लाख ५२ हजार रुपये वसूल झाले आहेत . संपूर्ण तपासणीमध्ये १ हजार ६१० लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या सगळ्यांकडून अद्यापही १ कोटी ३६ लाख १४ हजार वसुली करणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
उर्वरीत लोकांना नोटीसा पाठवून सात दिवसाच्या आत रक्कम जमा करण्याचे फर्मान काढले असून पैसे न जमा केल्यास ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज