टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शनिवार पेठ येथील वडार गल्ली, बेरड गल्ली, जय भवानी सोसायटी या भागांत सर्व बांधकाम कामगार व शेतमजूर कामगार वास्तव्यास आहेत. म्हणून या भागात जाणीव पूर्वक विकास होत नाही.
म्हणून बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात देशसेवा युनियन करणार रास्ता रोखो आंदोलन आज सोमवार दि. २८ फेब्रुवारी रोजी ११ वाजता सांगोला नाका, मंगळवेढा येथे करण्यात येणार आहे असे युनियनचे अध्यक्ष आदित्य मुदगुल-हिंदुस्तानी व युनियनचे सल्लागार चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या ‘या’ आहेत
बांधकाम कामगारांसाठी आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक उन्नती व्हावी यासाठी सर्व योजना आहेत. मात्र ह्या योजना तळा- गाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत. बांधकाम कामगार नोंदणी ही प्रत्येक गावा-गावात जावून नोंदणी करण्याचा उद्देश बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा आहे.
मात्र प्रत्येक्षात बांधकाम कामगार नोंदणी ही होत नाही. त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी शिबीर शनिवार पेठ,मंगळवेढा येथे त्वरीत आयोजीत करावे.
जय भवानी हाऊसिंग सोसायटी सर्व बांधकाम कामगार व शेतमजूर, असंघटी कामगार वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी आजही चालायला रस्ते, सांडपाण्यासाठी गटारे, घनकचरा व्यवस्थापन शौचालय, रस्त्यांवरील दिवे अशी नागरी सोई सुविधा आजही उपलब्ध नाही. तरी त्वरीत रस्ता, गटारी, रस्त्यांवरील दिवे ई. सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
सिटी सर्वे क्रमांक ३७५५ वडार गल्ली, मंगळवेढा येथे जुने समाज मंदीर असून ते जिर्ण झाल्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. सदर समाजमंदिर पावसाळ्यामध्ये गळते तरी त्या ठिकाणी सांस्कृतीक भवन आमदार फंडातून बांधून मिळावे.
जय भवानी हाऊसिंग सोसायटी मध्ये सर्व कुटूंब दारीद्र रेशेखालील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तरी या सोसायटी वरील महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स चे कर्ज होते
तरी त्या कर्जामधील ६०% रक्कम ही महामार्गामध्ये सोसायटीची जमीन गेल्यामुळे शासनाकडून आलेली रक्कम महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स ने भरून घेतलेले आहे. तरी उर्वरीत कर्ज हे सोसायटी मधील कुटूंब भरू शकत नाहीत त्यामुळे उर्वरीत कर्ज त्वरीत माफ करावे.
विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये वडार, बेरड, कैकाडी, धनगर अशा जातींचा समावेश होतो. या जाती-जमातीच्या वस्त्यांमध्ये विकास करण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजना आहे.
मात्र प्रत्यक्षात ती राबवली जात नाही. तरी नगरपालिकेच्या माध्यमातून तांडा वस्ती सुधार योजना त्वरीत राबविण्यात यावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज