mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रॅपिड अँटिजन टेस्टची संख्या वाढल्याने पंढरपूरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
रॅपिड अँटिजन टेस्टची संख्या वाढल्याने पंढरपूरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली

 

टीम मंगळवेढा टाईम्स । रॅपिड अँटिजन टेस्टची संख्या वाढवण्यात आली असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु असून याला नागरिकांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर शहरात व टाकळी उपनगरातही नागरिकांनी रॅपिड टेस्ट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.

शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकालावधीत रॅपिड अँटिजन टेस्टची मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्याच दिवशी 115, तर दुसर्‍या दिवशी 114 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

रविवारी दुपारपर्यंत 95 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 961 झाली असून सोमवारी सकाळपर्यंत एक हजाराचा आकडा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवार शहरात 250 जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 45 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

प्रशासनाच्यावतीने रविवारी तिसर्‍या दिवशीदेखील पंढरपूर शहर व टाकळी येथे रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. सुमारे एक हजार टेस्ट घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. शहर व उपनगरात प्रभागनिहाय लोकांची टेस्ट करण्यात येत आहे. यातच कोरोनाची संख्या वाढू लागली असल्याने लोक स्वत:हून टेस्ट करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. रविवारी प्राप्त अहवालानुसार 95 जण कोरोनाबाधित आढळून आले.

यात शहरात 45, तर ग्रामीण भागातील 51 रुग्ण आहेत. लक्ष्मीटाकळी येथे 28 रुग्ण आढळून आले आहेत. मुंढेवाडी 10, ओझेवाडी 7, तर खेडभाळवणी 3, वाखरी 1, खर्डी 2, भोसले 3, धोंडेवाडी 1, आढीव 1 रुग्ण आहेत. आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आजअखेर 24 झाली आहे. 431 जणांनी कोरोनावर मात करुन बरे होऊन घरी गेले आहेत. 506 जणांवर उपचार सुरु आहेत.

संचारबंदीच्या काळात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत असल्याने नागरिकांनी स्वत:हून टेस्ट करुन घेण्यासाठी बाहेर यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. संचारबंंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.

Rapid antigen tests increase the number of coronaviruses in Pandharpur

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अधिकारी कामं करत नसतील तर दंगा करा; ‘त्या’ काँग्रेस मंत्र्यांनी दिले कार्यकर्त्यांना अजब सल्ले

अधिकारी कामं करत नसतील तर दंगा करा; 'त्या' काँग्रेस मंत्र्यांनी दिले कार्यकर्त्यांना अजब सल्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा