टीम मंगळवेढा टाईम्स । रॅपिड अँटिजन टेस्टची संख्या वाढवण्यात आली असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु असून याला नागरिकांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर शहरात व टाकळी उपनगरातही नागरिकांनी रॅपिड टेस्ट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.
शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकालावधीत रॅपिड अँटिजन टेस्टची मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्याच दिवशी 115, तर दुसर्या दिवशी 114 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
रविवारी दुपारपर्यंत 95 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 961 झाली असून सोमवारी सकाळपर्यंत एक हजाराचा आकडा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवार शहरात 250 जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 45 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
प्रशासनाच्यावतीने रविवारी तिसर्या दिवशीदेखील पंढरपूर शहर व टाकळी येथे रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. सुमारे एक हजार टेस्ट घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. शहर व उपनगरात प्रभागनिहाय लोकांची टेस्ट करण्यात येत आहे. यातच कोरोनाची संख्या वाढू लागली असल्याने लोक स्वत:हून टेस्ट करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. रविवारी प्राप्त अहवालानुसार 95 जण कोरोनाबाधित आढळून आले.
यात शहरात 45, तर ग्रामीण भागातील 51 रुग्ण आहेत. लक्ष्मीटाकळी येथे 28 रुग्ण आढळून आले आहेत. मुंढेवाडी 10, ओझेवाडी 7, तर खेडभाळवणी 3, वाखरी 1, खर्डी 2, भोसले 3, धोंडेवाडी 1, आढीव 1 रुग्ण आहेत. आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आजअखेर 24 झाली आहे. 431 जणांनी कोरोनावर मात करुन बरे होऊन घरी गेले आहेत. 506 जणांवर उपचार सुरु आहेत.
संचारबंदीच्या काळात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत असल्याने नागरिकांनी स्वत:हून टेस्ट करुन घेण्यासाठी बाहेर यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. संचारबंंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.
Rapid antigen tests increase the number of coronaviruses in Pandharpur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज