मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मते आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य अध्यक्षपदाची निवड करतील किंवा ब्लॉक स्तरावरुन प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जाईल. If Rahul Gandhi refuses, who will be the new Congress president?
काँग्रेसचा अध्यक्ष हे गांधी कुटूंब सोडून इतर कोणी असले पाहिजे, असे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आधीच सांगितले आहे. पण राहुल गांधींनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वारंवार बोलत आहेत.
काँग्रेसचा अध्यक्ष हे गांधी कुटूंब सोडून इतर कोणी असले पाहिजे, असे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आधीच सांगितले आहे. पण राहुल गांधींनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वारंवार बोलत आहेत.
पण राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व सांभाळले नाही तर केवळ सोनिया गांधींनी पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे, असं देखील नेत्यांचं म्हणणं आहे.
सोनिया गांधी या काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद सोडण्याचा विचार करीत आहेत. काँग्रेसमध्ये बर्याच दिवसांपासून पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी होत आहे. सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
आज काँग्रेस वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चेसाठी बोलावण्यात आली आहे.
पण आज सोनिया गांधी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतील आणि सभासदांना कोणाला अध्यक्ष करावे यासाठी विचारणा करतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज