टीम मंगळवेढा टाईम्स।
शक्तीदेवीच्या विसर्जनावेळी मंगळवेढा शहरात सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरड करून शिवीगाळ, एकमेकांशी झुंज करणाऱ्या ११ युवकांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दि.५ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा शहरात शक्तीदेवीची विसर्जन मिरवणूक चालू होती. रात्री साडेअकराच्या दरम्यान सांगोला नाका परिसरात मिरवणूक आली असता
सार्वजनिक रस्त्यावर सलमान बेग, ओंकार राजमाने, प्रसाद माने, श्रेयश राजमाने, शैलेश राजमाने (रा.कुंभारगल्ली), अजून काहीजण शिवीगाळ करीत
ओरडून एकमेकांना झोंबाझोंबी करत असताना बंदोबस्तासाठी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर काहीजण पळून गेले.
पोलिसांनी प्रतीक होडगे, प्रसाद होडगे, गणेश कुराडे, कपिल प्रचंडे, गणेश राजमाने, दादा बुरजे यांच्यासह अकरा जणांविरूद्ध पोहेकाँ हजरत पठाण यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज