टीम मंगळवेढा टाईम्स ।
धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा येथे क्यूआर कोड ची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
याचा शुभारंभ धनश्री मल्टीस्टेटचे चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे व ज्येष्ठ संचालिका प्रा.शोभाताई काळुंगे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी श्री.सद्गुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड, दिपाली काळुंगे-पाटील, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे व धनश्री मल्टीस्टेटचे सर्व शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
क्यूआर कोड च्या माध्यमातून खातेदारांना ऑनलाईन व्यवहारासाठी सुविधा मिळणार असून, यापूर्वी कोअर बॅंकिंग, आरटीजीएस, एफ. ई. एफ. टी., बँकेमार्फत सुरु आहे.
क्यु-आर कोडचे वाटपही आता सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या डिजिटल संगणक युगात रोख देवघेवीचे व्यवहार कमी हाेत चालल्याने बँकेच्या खातेदारांना त्यांचे व्यवसायातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी मदत होणार आहे.
सर्व बचत व चालू ठेव खातेदारांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. व्यापारी, दुकानदार या सुविधेचा वापर करून रोख विरहित व्यवहार करू शकतात.
ट्रस्ट, शैक्षणिक संस्था, देवस्थाने देखील क्यूआर कोड द्वारे विविध प्रकारची शुल्क, देणग्या विनासायास त्वरित आपल्या खात्यामध्ये जमा करून घेऊ शकतात.
विशेष म्हणजे ही सुविधा अद्ययावत तर आहेच पण त्याचबरोबर ती किफायतशीर व सुरक्षित देखील आहे. क्यूआर कोड सुविधेचा वापर फक्त पैसे खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी केला जातो.
क्यूआर कोड द्वारे व्यवहार करताना बेनेफिशअरीला स्वतःच्या बँकेचे तपशील (उदा. खाते क्रमाांक, आयएफएससी कोड इ.) पेमेंट करणाऱ्यांशी शेअर करण्याची गरज नाही.
व्यवहार पूर्ण झाल्यानांतर त्या संबंधीचा ‘एसएमएस’ देखील खातेदारास पाठवला जातो. खातेदाराने अधिक वाट पाहता आपल्या व्यवहाराला कॅशलेसचे स्वरूप देण्यासाठी आजच धनश्री मल्टीस्टेटच्या नजीकच्या शाखेस भेट देऊन फॉर्म भरा व या अद्ययावत सेवेचा लाभही घ्यावा असे आवाहन सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांनी केले आहे.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज