टीम मंगळवेढा टाईम्स । आवडत्या कुत्र्याचा गळा आवळ्याच्या रागातून मित्राचा खून करत मृतदेह राहत्या घरात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपीच्या मागावर असून, त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
किरण शिवाजी डोळे (वय 25, रा. आय्याप्पा स्वामी मंदिराजवळ, आगम टेकडी कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर 4 गुन्हे दाखल असून, तो व्यसनी आहे.
तर त्याचा मित्र आरोपी ओंकार झोरी याच्यावर देखील एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी दोघेजण झोरी याच्या घरी दारू पित बसले होते.
झोरी याने कुत्रे पाळलेले आहे. ते त्याचे आवडतीचे कुत्रे आहे. दोघे दारू पित असताना डोळे याने त्या कुत्र्याचा गळा आवळला. याचा राग आरोपी झोरी याला आला. यातून दोघांमध्ये वाद झाले.
या वादातूनच झोरी याने डोळे याचा खून केला. खुनानंतर त्याने घरातच एका कोपऱ्यात डोळे याचा मृतदेह पुरून टाकला आणि तो घराला कुलूप लावून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने हा प्रकार आईला सांगितला. तसेच तो पसार झाला. यावेळी आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी पोलिसांना या खुनाचा उलघडा झाला. यघटनेची माहिती वाऱ्या सारखी परिसरात पसरली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांची दोन पथके आरोपीच्या मागावर असून, त्याला लवकरच पकडण्यात येईल असे सांगण्यात आले.
The murder of a friend by the rage of a dog’s throat amla; The body was buried in the living room
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज