पुणे । राज्यात ११ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार आहेत. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजाकडून १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
यासंदर्भात अनेक स्पर्धापरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी फोन व मेसेजद्वारे संपर्क साधून या महाराष्ट्र बंदचा परिक्षेवर काही परिणाम होऊ नये याबद्दल विनंती केली आहे.आपण मराठा समाजाचे मार्गदर्शक आहात,आपल्या शब्दाला समाजात मान आहे.
त्यामुळे आपण अधिकारवाणीने मराठा आंदोलकांना कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत आवाहन करावे अशी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन मी आपणाला विनंतीचे निवेदन सौ.नीता ढमाले यांनी दिले आहे.
यासोबतच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरभरती बाबत जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्याविषयी शासन स्तरावर योग्य तो समन्वय साधून सर्व जातीधर्माच्या विद्याथ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात खा.संभाजीराजे छत्रपतीयांनी वेळोवेळी घेतलेल्या सामंजस्यपूर्ण भूमिकेचे स्वागत करून केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात आपण जे पाठींब्याचे निवेदन देणार आहात त्यामध्ये माझाही पाठींबा जाहीर करत असल्याचे निवेदन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार सौ.नीता ढमाले यांनी दिले आहे.
Maharashtra Bandh should not have repercussions on Public Service Commission exams; Statement of Mrs. Nita Dhamale to MP Sambhaji Raje
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज