टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाळण्यात आलेला जनता कर्फ्यु सोमवारी समाप्त झालेला असल्याने आजपासून अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी दिली.
मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीच्या दरम्यान मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत होती.त्यामुळे व्यापारी संघटनेनी पुकारलेला 15 दिवसाचा कडक जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता.
मंगळवेढा शहर, संत दामाजी नगर व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दि.30 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये आजपासून ते दि.15 मे 2021 पर्यंत फक्त अत्यावश्यक दुकानांना कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी असेल. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद असेल. शनिवार व रविवार फक्त दूध (सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 8), मेडिकल व दवाखाना यांना परवानगी असेल.
दुकान मधील दुकान मालक व कर्मचारी यांच्याकडे लस किंवा कोरोना टेस्ट केलेले रिपोर्ट असणे बंधनकारक असणार आहे. सर्वांनी सुरक्षित अंतर पाळावे. नागरिकांनी ही दुकानासमोर गर्दी करू नये. मस्कचा वापर करावा.
विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. भाजीपाला व फळे यांनी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फिरून विक्री करायची असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवेढा शहर, संत दामाजी नगर व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यवसायिकांनी कोरोना ची भयानक परिस्थिती असल्याने आपण सर्वांनी मिळून 15 दिवस जनता कर्फ्यु पाळल्याने सर्वांचे आभार प्रशासनाच्या वतीने मानण्यात आले आहेत.
‘ही’ दुकाने अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील
सर्व किराण दुकाने, भाजीपाल्यांचे दुकाने , फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी , सर्व प्रकारची अन्न पदार्थांची दुकाने (चिकन , मटन, कोंबडया, मासे आणि अंडी यांचेसह), कृषी विषयक सेवेसंबंधीत व कृषी अवजारे संबंधीत सर्व दुकाने तसेच शेतमाल,
पाळीव प्राण्यांची पशुखादय दुकाने व येऊ घातलेल्या पावसाळयाशी संबंधीत असलेल्या वैयक्तीक वापरासाठीचा तसेच संस्थात्मक वापरासाठीच्या मालाच्या पुरवठयासंबंधीत असणारी दुकाने सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालू राहतील .
हॉस्पीटल, डायग्नॉस्टिक सेंटर , क्लिनीक , लसीकरण , वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये , फार्मसी , फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबधी डिलर्स आणि त्यांची वाहतुक व वितरण तसेच लसी , सॅनिटायझर , मास्क , वैद्यकिय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहायक बाबी , कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबधित सेवा यांचा समावेश असेल .
सार्वजनिक वाहतूक : – ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस . कृषी निगडीत सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा सुरळित सुरु राहण्यासाठी बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरूस्ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालु राहतील . सर्व व्यापारी माल ( Commodity ) संबधित आयात – निर्यात ई – कॉमर्स ( केवळ अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठयासाठी )
प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी , पेट्रोलपंप आणि पेट्रोलिअमशी निगडीत ऑफशोअर , ऑनशोअर उत्पादने . सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटा सेंटर / क्लाऊड सेवा/माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत क्रिटीकल इन्फास्ट्रक्चर आणि संबधित सेवा . शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा इलेकट्रीक आणि गॅस पुरवठा सेवा .बँक ATM पोष्ट सेवा. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा.
अत्यावश्यक सेवेत नागरिकांना सेवा पुरविणार्या व्यापार्यांकडून कोणत्याही प्रकारचे संसर्ग पसरू नये याची दक्षता घेण्याकरिता व्यापारी व दुकानातील कर्मचार्यांनी कोरोना चाचणी व लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. या चाचण्यांचे रिपोर्टची तपासणी पालिकेकडून करण्यात येईल. तसेच सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सक्ती सूचनाही दिल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज