टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तहसील कार्यालय , पोलिस स्टेशन आवार, एस.टी. डेपो आवारमधील जप्त केलेला अवैध वाळू वाहतुकीमधील १६१.८८ ब्रास वाळू साठयाचा जाहिर लिलाव दि.११ रोजी दुपारी १२.०० वा उपविभागीय तथा प्रांताधिकारी कार्यालयात होणार असल्याने
इच्छूक व्यक्तींनी नमूद ठिकाणी वाळू साठयाची पाहणी करून लिलावात भाग घेण्यासाठी दि.८ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
भिमा नदी, माण नदी व अन्य ठिकाणाहून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी वाहने महसूल व पोलिस प्रशासनाने जप्त करून तो वाळू साठा तहसील कार्यालय आवारात १११.०१ ब्रास , पोलिस स्टेशन आवार ४२ ब्रास , एस.टी.डेपो आवारात ८.८७ ब्रास असा एकूण १६१.८८ ब्रास वाळूसाठयाचा जाहिर लिलाव अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि . ११ रोजी दुपारी १२.०० वा . उपविभागीय कार्यालयातील निजी कक्षात होणार आहे.
दरम्यान इच्छूक व्यक्तींनी वर नमूद ठिकाणी वाळू साठयाची पाहणी करून लिलावात भाग घेण्याकरीता दि. ८ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज करावेत असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लिलावाच्या अटी- १६१.८८ ब्रास वाळूची अपसेट प्राईस रक्कम ५ लाख ९ ८ हजार ९ ५६ रुपये , लहूतम किमतीच्या २५ टक्के रक्कम लिलावामध्ये भाग घेतेवेळी रोख अथवा डी.डी.व्दारे जमा करावी , सर्वोत्तम बोलीच्या २५ टक्के रक्कम ठिकाणाहून तात्काळ शासकीय खजिन्यात चलनाव्दारे त्याच महसूल दिवशी जमा करावी,
सर्वोत्तम बोलीची उर्वरीत ७५ टक्के रक्कम ७ दिवसाच्या आत खजिन्यात भरावी अन्यथा २५ टक्के रक्कम परत केली जाणार नाही लिलावातील वाळू नमूद ठिकाणावरून वाहनाव्दारे उचल व वाहतूक करावयाची आहे.आदी अटी आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज