टीम मंगळवेढा टाईम्स ।
सभासदांना आवश्यक माहिती उपलब्ध करून न देणाऱ्या दामाजी कारखाना प्रशासनास जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) राजेंद्रकुमार दराडे यांनी कार्यकारी संचालक रमेश गणेशकर यांना लेखी पत्राद्वारे तत्काळ माहिती द्यावी,
अन्यथा पुरेशा माहितीअभावी एखादा मतदार यादीत न आल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, अशा शब्दात सुनावले.
श्रीसंत दामाजी कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द केला आहे.
त्यानुसार सभासदांकडून प्राप्त तक्रारी विचारात घेऊन सभासदांना आवश्यक माहिती व कागदपत्रे मुख्यतः सभासदांकडील येणेबाकीची यादी, नव्याने केलेल्या सभासदाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
दि.५ मे रोजी आक्षेपावरील सुनावणीवेळी असे निदर्शनास आले की, आपण सभासदांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही. परिणामी आक्षेपकर्त्यांना सुनावणीवेळी त्यांची बाजू मांडण्यास अडचणी आल्यामुळे आक्षेपकर्त्यांचा रोष दिसून आला.
दि.४ मे रोजी सुनावणीवेळी आपणास नमुना आय रजिस्टर व नमुना जे रजिस्ट्रर सादर करण्याबाबत सूचित केले होते.
परंतु ५ मे रोजी आपण ते सादर केलेले नाही, असे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी पत्रात नमूद केले आहे.(स्रोत:लोकमत)
सभासदांना अजून काही माहिती हवी असेल तर देऊ
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांचे पत्र आज प्राप्त झाले आहे . याबाबत पूर्वीही माहिती दिली आहे . त्यांच्या सूचनेनुसार असल्यास ती देऊ . त्यांचे इतर कोणते सभासदांना अजून काही माहिती हवी प्रश्न असतील तर तेही समजून घेऊ. – रमेश गणेशकर , कार्यकारी संचालक दामाजी साखर कारखाना
मताचा घोळ कारखाना प्रशासनाने केला
दामाजी कारखाना प्रशासनाने राजकीय हेतूने सभासदांची नावे वगळली आहेत . कमी केलेले २५०० व नवीन समाविष्ट केलेली २५०० अशा ५ हजार सभासदांच्या मताचा घोळ कारखाना प्रशासनाने केला आहे. त्यामुळे सभासदांना यादी देण्यास मी तक्रार केली . टाळाटाळ केली जात आहे . – अॅड.नंदकुमार पवार, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज