टीम मंगळवेढा टाईम्स ।
शहराच्या लोकसंख्या वाढीबरोबर हद्दीबाहेर बांधकामे वाढल्यामुळे त्यांना सोयी सुविधा करणे पालिकेला अडचणी ठरत आहे. म्हणून पालिकेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या

हद्दवादवाढीचा प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित असून त्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलेली मागणी महत्त्वाची आहे पण या मागणीकडे सत्ताधारी पक्षाने का दुर्लक्ष का केले याची चर्चा शहारात सुरू झाली.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले त्यावेळी अनिल सावंत यांच्या निवासस्थानी त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अनिल सावंत यांच्याबरोबर शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, संतोष रंधवे, प्रथमेश पाटील, सिताराम भगरे, श्याम गोगाव आदी उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवेढा शहराची लोकसंख्या वाढल्याने वाढत्या लोकसंख्येला सोयी सुविधा करणे सध्या होत नाही.
मंगळवेढा शहराच्या हद्दीबाहेर अनेक बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली असून आणखी नव्या ग्रामपंचायतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. शहराच्या लगत असलेला लोकवस्तीचा परिसर पालिकेत वर्ग केल्यास त्यांना पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा करणे शक्य होणार आहे.

हद्दीमध्ये समाविष्ट केल्यास पालिकेचे उत्पन्न कररूपाने वाढणार आहे, याशिवाय महात्मा बसवेश्वर व चोखोबा स्मारकाचा प्रस्ताव देखील शासन स्तरावर प्रलंबित आहे त्या प्रस्तावाला मान्यता मिळावी.
शहराची रचना खोलगट असल्यामुळे सध्या नगरपालिकेने शहरातील भूमिगत गटारीचा प्रस्ताव दाखल केला आहे त्या प्रस्तावना देखील मान्यता द्यावी अशी मागणी केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










