mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार समाधान आवताडे यांना पक्षाने दिली मोठी जबाबदारी; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2024
in मंगळवेढा
देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात आमदार समाधान आवताडे यांना बळ मिळणार;  मंत्रिमंडळाची लॉटरी लागणार? उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून राजकीय संकेत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांना प्रमोशन मिळाले असून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी समाधान आवताडे यांची वर्णी लागली आहे.

प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या आवताडे यांच्यासाठी ती मोठी संधी मानली जात आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.

विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात ही जनगण आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली.

त्यानंतर विधानसभा ॲड राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड जाहीर केली आहे.

विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एका आमदाराची वर्णी लावण्यात आली आहे.

तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर, समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमिन पटेल या पाच आमदारांची निवड तालिका अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

समाधान आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता.

मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे समाधान आवताडे आणि त्यांचा मतदारसंघ चर्चेत होता.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून त्यांना बढती मिळाली असून विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे.

समाधान आवताडे यांच्या अगोदर या मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे, त्यामुळे प्रथमच आमदार झालेल्या आवताडे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.(स्रोत:सरकारनामा)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
Next Post
धाकधूक वाढली! मंगळवेढ्यात घरासमोर हँडल लॉक करुन लावलेल्या दोन मोटर सायकली अज्ञात चोरट्याने पळविल्या

खळबळजनक! मंगळवेढ्यात भर दिवसा दुकानासमोर लावलेली मोटर सायकल अज्ञात चोरटयाने हातोहात पळविली; चोरट्यांना पोलीसांची भीती आहे की नाही?

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा