mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 9, 2021
in राज्य, मंगळवेढा
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूरचे बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी आणि मंगळवेढा येथील नियोजित महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अंदाजपत्रकात घोषित केले. परंतु, त्यासाठी कोणतीच निधीची तरतूद करण्यात आली नाही.

शिवाय राज्यासाठी जाहीर केलेल्या अनेक प्रकल्प, तसेच घोषणांतून जिल्ह्यालाही निधी मिळेल; पण त्याचीही हमखास निश्चिती नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या अंदाजपत्रकातून सोलापूर जिल्ह्यासाठी ‘बडा गम अन् थोडी खुशी’ असा प्रत्यय येत आहे.

कोरोना काळातील संर्घषानंतर 2021-22 या वर्षाचे राज्याचे अंदाजपत्रक पवार यांनी विधीमंडळ सभागृहात सादर केले.

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा शहरातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी आवश्‍यक त्या निधीची तरतूद करण्यात येईल असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्यामुळे स्मारकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र यासाठी निधी दिला जाईल असे ठोस आश्वासन मात्र दिलं गेलं नाही. त्यामुळे निधी कधी मिळणार का नुसतीच घोषणा झाली हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

मंगळवेढा शहरात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती. मागील फडणवीस सरकारच्या काळात याबाबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती निश्‍चित करण्यात आली होती.

या समितीकडून कृषी खात्याची 35 एकर जागा निश्‍चित करून 100 फुटांची मूर्ती, स्मारक परिसरामध्ये ग्रंथालय, ध्यानकेंद्र, अभ्यास केंद्र स्मारक, कृषी पर्यटन स्थळ, भक्त निवास, शेतकरी निवास, महात्मा बसवेश्वर यांची माहिती देणारे फलक आदींचा समोवश असलेला आराखडा निश्‍चित करण्यात आला होता.

या समितीने 151 कोटी खर्चाचा आराखडा बनवून तो सरकारला सादर केला होता. आमदार भारत भालके यांनी विधानसभेत याबाबत अनेक वेळा आवाजदेखील उठवला होता.

परंतु मागील सरकारच्या काळात या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची यावरून हा प्रस्ताव परत आला होता.

नगरपालिकेने त्याबाबतचे पत्र दिले होते. परंतु ही जागा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने याबाबतची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याकडे केली असल्याचे समजते.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्यामुळे भविष्यात पर्यटनाच्या संधी वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अर्थसंकल्पउपमुख्यमंत्री अजित पवारबसवेश्वर स्मारकमंगळवेढा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात भर दिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्याने 70 हजार रुपयाचा मुद्देमाल केला लंपास; बंद घरे चोरटे करताहेत टार्गेट

January 29, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

January 30, 2023
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा अंदाज; हवामान विभागानं वर्तवली शक्यता

January 28, 2023
Next Post
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त; प्रशासक म्हणून 'हे' पाहणार कारभार

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..