टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे, मरवडे नंतर आता अरळी,धळगाव येथे दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. गावात भाजी, किराणा माल व औषधासाठी मिळणाऱ्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन नागरिक रस्त्यावर गर्दी करीत आहेत.
तसेच आंधळगावात आतापर्यंत १७ बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अरळी,आंधळगाव व १ किमी पर्यंतचा परिसर बुधवारी रात्रीपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी काढले आहेत.
गावात भाजी, किराणा माल व औषधासाठी मिळणाऱ्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन नागरिक मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करीत आहेत. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.गावात सूक्ष्म लक्षणे असलेले, उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
त्यातील काही रुग्ण बाहेर फिरत असल्याने रुग्ण वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आंधळगावात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले. मात्र, त्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यापुढील काळात नागरिकांना करोना विषाणूचा सामना करीतच दैनंदिन व्यवहार करण्याची जीवनपद्धती अवलंबवावी लागणार आहे. रुग्ण वाढल्यास संबंधित भौगोलिक क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते.
प्रतिबंधित क्षेत्राला मिळणाऱ्या सवलती इतर क्षेत्रांपेक्षा अत्यंत कमी असल्याने येथील नागरिकांना कठोर नियमांचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी यापुढील काळात मास्क वापरणे, हात सातत्याने स्वच्छ धुणे, समोरील व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखून काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
जो कोणी या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज