टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार नियमानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

तरी संबंधित बँकांनी नुकसानभरपाईची रक्कम कर्ज खात्यात रक्कम जमा करून घेऊ नये. अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार कार्यालयाकडून बँकांना देण्यात आला आहे.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना बँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.

त्या रकमेतून काही बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम वसूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भरपाईच्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करताना त्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली होणार नाही, याबाबत बँकाना सूचना द्याव्यात.

तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रकमेतून वसुली केल्याचे आढळल्यास बँकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार मदन जाधव यांनी दिला आहे.

लेखी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
मंगळवेढा तहसीलदारांनी व्यवस्थापक, अग्रणी बँक, तालुका मंगळवेढा यांना शेतीपिकाच्या अनुदान रकमेतून वसुली न करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसा लेखी अहवाल जिल्हाधिकारी कुमार: आशीर्वाद यांना माहितीस्तव देण्यात आला आहे.

तसेच प्रत्येक सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम बँकांनी कर्जात मोडून घेतल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ तलाठी, सर्कल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













