मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस. ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाला आज नवीन संसद भवन मिळालं. नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल भाषण केलं. “नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन येतो.
या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती आहे तसंच संविधानाचा आवाज आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून नव्या संसद भवनासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात पोहोचले.
त्यांचे स्वागत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणानंतर त्याच्या हॉलमध्ये सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी सर्वधर्म प्रार्थना सभेत लोकशाहीच्या या मंदिरात सर्वधर्म समभाव दिसून आला. नव्या संसद भवनाच्या हॉलमध्ये सर्व धर्म प्रार्थना सभेत 12 धर्मांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या धर्मातील पवित्र शब्द म्हटले आणि नव्या संसदेसाठी प्रार्थना केली.
#WATCH | ‘Sarv-dharma’ prayers are underway at the new Parliament building as the inauguration ceremony is led by PM Modi pic.twitter.com/6NyADeDZoM
— ANI (@ANI) May 28, 2023
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय इतर मान्यवर उपस्थित होते. एएनआय वृत्तसंस्थेने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसतं की सर्व धर्माचे प्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार प्रार्थना करत आहेत. यावेळी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेसुद्धा आहेत.
प्रार्थना झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ होम हवन अनुष्ठानात पंतप्रधान सहभागी झाले. त्यानंतर लोकसभेच्या सभागृहात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सेंगोलची विधीवत पुजा करण्यात आली.
या सेंगोलसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साष्टांग दंडवतही घातला. संताच्या नेतृत्वात सेंगोल घेऊन पंतप्रधान मोदी संसद भवनात दाखल झाले. लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत लोकसभा सभापतींच्या खुर्चीसमोर सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज