टीम मंगळवेढा टाईम्स ।
तीन दिवसांपूर्वी स्थगित झालेला सोलापूर विमानतळ लोकार्पण सोहळा आज रविवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होटगी विमानतळावर होणार आहे. या ठिकाणी उभारलेल्या सभामंडपात डिजिटल स्क्रीन व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण शंभर जणांना विमानतळावर प्रवेश असणार आहे, अशी माहिती जिल्हा , प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी दिल्ली येथून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. यात सोलापूर विमानतळाचाही समावेश आहे. ३० सेकंदात मुख्य उद्घाटन सोहळा होणार असून, यासोबत विमानतळाचा २ मिनिटांचा व्हिडीओवदाखवले जाणार आहे.
तीन खासदार, अकरा विधानसभा सदस्य तसेच तीन विधान परिषदेच्या सदस्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. यासोबत उद्योजक, काही प्राध्यापक तसेच बँक अधिकाऱ्यांसह मान्यवरांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.
याशिवाय इतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी डीजीसीएने परवाना मंजूर केला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी डीजीसीएच्या टीमकडून विमानतळाची तपासणी झाली होती. डीजीसीएच्या परवानानंतर विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज