टीम मंगळवेढा टाईम्स ।
वादग्रस्त ठरलेले सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार सुमारे २५ हजारांची लाच घेतना रंगहाथ पकडले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील घराची कोल्हापूर एसीबीने तब्बल पाच तास झाडाझडती घेतली.
सोमवारी रात्री सुरू दहापासून सुरू झालेली तपासणी आज मंगळवारी पहाटे तीनपर्यंत सुरू होती. लोहार यांच्या स्थावर मालमत्तेचा अहवाल कोल्हापूर एसीबी सोलापूर एसीबीकडे सोपविण्यात येणार आहे.
किरण लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या तीनही ठिकाणी ते वाद्ग्रस्त राहिले आहेत.
सोलापुरात पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. लोहार हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरमधील शिक्षक कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. त्या घराची कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी केली.
पहाटे तीन पर्यंत तपासणी सुरू होती
लोहार यांच्या घराची सोमवारी रात्री दहापासून मंगळवारी पहाटे तीन पर्यंत ही तपासणी सुरू होती. या तपासणीमध्ये कागदपत्रे, बॅंकांचे पासबुक आणि इतर कागदपत्रे पाहण्यात आली. ही सर्व कागदपत्रांचा अहवाल कोल्हापूर एसीबी सोलापूर एसीबीकडे सुपूर्त करणार आहे.
घरात अनेक कागदपत्रे, घराबाहेर तीन ते चार अलिशान गाड्या
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तपासणीत कोणतीही रोख रक्कम आढून आलेली नाही. मात्र, घरात अनेक कागदपत्रे आढळून आली आहेत.
तसेच, घराबाहेर तीन ते चार अलिशान गाड्या आहेत. स्थावर मालमत्तेचा अहवाल कोल्हापूर एसीबी ही सोलापूर एसीबीकडे सुपूर्त करणार आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये वाद्ग्रस्त ठरलेले आणि पैसे घेताना पकडण्यात आलेले किरण लोहार सोलापूर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्याच अनुंषगाने आज त्यांच्या कोल्हापूरमधील घराची तब्बल पाच तास झाडाझडती घेण्यात आली.(स्रोत:सरकारनामा)
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी, सत्र न्यायालयाचा निर्णय
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयान यासंबंधित आदेश देत किरण लोहार यांना 3 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज