मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपदानंतर त्यांची वर्णी ऊसदर नियंत्रण मंडळामध्ये लावण्यात आलेली आहे.
त्यामुळे एकीकडे समाधान आवताडे यांना विधानसभेची वाट मोकळी करून देताना प्रशांत परिचारक यांनाही ताकद देण्याचे काम पक्षाकडून करण्यात येत आहे.
ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची राज्य सरकारकडून गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. त्यात सहकारी साखर कारखान्याच्या गटातून माजी आमदार तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, नगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
खासगी साखर कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीरोज उद्योगचे संचालक दामोदार हरिभाऊ नवपुते, तर नागपूरमधील मानस ॲग्रो इंडिस्ट्रीजचे आनंदराव राऊत यांना संधी देण्यात आलेली आहे.
शेतकरी प्रतिनिधी गटातून सुहास पाटील (माढा, जि. सोलापूर), सचिनकुमार नलावडे (कराड, जि. सातारा), पृथ्वीराज जाचक (इंदापूर, जि. पुणे), धनंजय किसनराव भोसले (औसा, जि. लातूर), योगेश माधवराव बर्डे (दिंडोरी, जि. नाशिक) यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर पोटनिवडणकीत माघार घेऊन आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी त्याग केला होता. राज्यात सरकार आल्यानंतर मात्र परिचारक यांना ताकद देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गावे येतात. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपद हे परिचारक यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे. त्यानंतर त्यांची ऊसदर नियंत्रण मंडळावर नियुक्ती करत त्यांच्यावर आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज