mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा नगरीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी ‘या’ नेत्यांनी दिले आश्वासन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 15, 2021
in मंगळवेढा, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

संतांची भूमी म्हणून संपूर्ण भारत वर्षात आपल्या आद्यात्मिक वारशाने ख्यातकिर्त झालेल्या मंगळवेढा नगरीने प्रकाशआणा शेंडगे यांना ओबीसी योध्दा पुरस्कार देवून त्यांचा जीवनगौरव केला. हजारोच्या संख्येने उपस्थितीत जनसमूदयाच्या साक्षीने हा पुरस्कार देण्यात आला.

मंगळवेढा वेध 7 वा वर्धापनदिना निमित्त शनिवारी दुपारी श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळयात तब्बल वीस गुणीजनांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

 

कामाची बातमी: शिवजयंतीच्या निमित्ताने अमर इलेक्ट्रॉनिक्सची भन्नाट ऑफर!  फक्त 19 रु.मध्ये खरेदीकरा कुलर, AC, फ्रीज, टीव्ही व मोबाईल आणि मिळवा 1900 रु किंवा 19 टक्केचा डिस्काउंट

यावेळी अध्यस्थानी होलार समाज संघटना प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार होते. विचारपिठावर भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, विठ्ठल शुगरचे चेअरमन भगीरथ भालके, होलार समाज राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार, नेते सोमनाथ भोसले, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्ष नेते अजित जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत बेदरे,पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष रजाकभाई मुजावर , मार्केट कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, शिक्षक नेेते सुरेश पवार, कवठे महांकळचे उद्योजक प्रदिप वाले, मा. पोलिस उपअधिक्षक निरक्षिक रविंद्र शिंदे,पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे,संपादक शिवाजी केेंगार यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन व मराठी वृत्तपत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, कोरोना महामारीच्या संसर्गजन्य अशा भयानक आजारात बळी गेलेल्या जिल्हयातील नेत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सा.मंगळवेढा वेध वर्धापन दिनानिमित्त आदर्श माता,आदर्श पोलिस कर्मचारी, आदर्श आरोग्य सेवक, आदर्श महसूल कर्मचारी यांच्यासह आदर्श शिक्षक, आदर्श दुध संस्था चेअरमन, आदर्श पत्रकार आदींचे ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाशआण्णा शेंडगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती भारत मासाळ,माजी उपसभापती रमेश भांजे, जि.प.चे माजी सदस्य बापूराया चौगुले, शिक्षक नेते संजय चेळेकर, डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे, सिध्दापूरचे सरपंच आण्णासो नांगरे-पाटील, गंगाधर काकणकी,होलार समाजाचे प्रा.मधूकर भंडगे,मरवडेचे माजी सरपंच रतिलाल केंगार,गोपाळपूर गो शाळचेे संस्थापक गजेंद्र भोसले,हुन्नूरचे माजी सरपंच भैरू भोसले,परमेश्वर आवताडे, लेंडवे चिंचाळेचे माजी सरपंच देवा इंगोले,निवृत्त लष्करी अधिकारी गोपाळराव जाधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

श्री शिवाजी केंगार सौ.राधिका केंगार यांना प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या हस्ते शेवटी गौरविण्यात आले.

आपल्या सत्काराच्या कार्यक्रमास उत्तर देताना प्रकाशआण्णा शेंडगे यांनी ओबीसी योध्दा पुरस्कार आपणास मंगळवेढयाच्या पावित्र्य नगरीत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, मंगळवेढयात एकूण 24 संत झाले असून हा जागतिक विक्रम आहे. श्री संत चोखामेळा श्री संत कान्होपात्रा यांच्या अद्यात्मिक कार्याने मंगळवेढा तालुका समतेची पंढरी म्हणून ओळखली जाते.

तसेच बाराव्या शतकात बसवेश्वरांनी केलेल्या कार्यामुळे हे शहर समतेची राजधानी मानले गेली आहे. अशा या भूमित आपणास ओबीसींचा योध्दा म्हणून पुरस्कार देवून आपला गौरव केला जातो, ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे, असे भावपूर्ण उदगार प्रकाशआणा शेंडगे यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणवादी आणि ओबीसी आरक्षणवादी असे आज दोन गट महाराष्ट्रामध्ये आरक्षणवादयामध्ये पडले आहेत. वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कधीही विरोध केला नाही, तथापी ओबीसी सारख्या दुर्बल घटकाला मिळालेले

आरक्षण,मराठा समाजाने आपले हिस्सेदारी मागू नये, सामाजिक दृष्टया व कायदयाच्या दृष्टीने ते चुकीचे आहे. असा गंभीर इशारा श्री शेंडगे यांनी दिला. मराठा समाजाला स्वताच्या बळावरती 10टक्के आरक्षण केंद्राचे आरक्षण मिळू लागले आहे. आणि राज्य सुध्दा त्यांना असे आरक्षण देवू लागले आहे.

ही मराठा समाजासाठी मोठी प्राप्ती झाली आहे.याकडे दुर्लक्ष करून ओबीसीच्या ताटातले आरक्षण मागण्याचा नतदृष्टपणा मराठा समाजाने करू नये, असे आवाहन श्री शेंंडगे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.

आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत धनगर,भटक्या विमुक्त आणि ओबीसी यांच्या आरक्षणास धक्का लागू देणार नाही, वेळ पडली तर प्राणाची बाजी लावून त्यांचे आरक्षण संवर्धीत करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंगळवेढा नगरीच्या तिर्थक्षेत्र अ दर्जा मिळणे आवश्यक असतानाही शासनाने मंगळवेढा नगरीवर अन्याय केला आहे. आपण याबदद्ल मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करू असे अश्वासन दिले.

मंगळवेढा तालुक्यामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून आजपर्यत राजकारणी मंडळींनी केवळ थापा मारली आहे. आपण आमदार असताना म्हैसाळ योजनेचे पाणी आणून 52 गावाला नंदनवन केले. आणि आता तेच पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळू लागले आहे. यापुढे सुध्दा मंगळवेढयाचा पाणी प्रश्न आपण सत्तेवर असो किंवा नसो या तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी असेही प्रतिपादन यावेळी बोलातना व्यक्त केले.

पुरस्कार विजेते आदर्श माता फुलाबाई मच्छिंद्र भोसले, आदर्श संघर्षशील राजकीय योध्दा रामचंद्र मळगे, आदर्श शाखा अभियंता नंदकुमार कोष्टी, आदर्श आरोग्य सेवक रणजित लेंडवे, आदर्श युवा चेतना समाजरत्न गजानन पाटील, आदर्श चेअरमन प्रमिला मारूती बाबर, समाजभूषण नाथा ऐवळे, आदर्श दुध संस्था चेअरमन धनाजी गावकरे, आदर्श पशुधन विकास अधिकारी सुहास सलगर, आदर्श कृषी सहाय्यक सुभाष भजनावळे,आदर्श वनरक्षक भागवत मासाळ,आदर्श सा.संपादक प्रमोद बिनवडे,

आदर्श ग्रामसेवक अनिल कोळेकर,आदर्श पोलिस नाईक हरीदास सलगर, आदर्श मंडलअधिकारी राजू बनसोडे,आदर्श शिक्षक राजाराम देवकते, शिवानंद कोळी, दत्तात्रय सलगर साहित्यरत्न, कोविड योध्दा म्हणून डॉ.ब्रम्हानंद कदम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भटक्या विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, होलार समाजाचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार, शिक्षक नेते सुरेश पवार आदीनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हैदर केंगार तर सुत्रसंचालन अक्षय टोमके यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

June 30, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 30, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळणार, भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार; ‘या’ तारखेपर्यंत असणार दिवसभर दर्शन उपलब्ध

June 29, 2025
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

June 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025
Next Post
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा ब्रेकिंग! शहरातून वीस वर्षीय तरुण बेपत्ता; वडिलाची पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

June 30, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 30, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा