टीम मंगळवेढा टाईम्स । सरकारने एक महिना स्वतः जनावरे सांभाळून त्याला चारा घालून स्वतः दूध काढून डेरीला घालावं यात किती फायदा होतो हे शेतकऱ्यांना दाखवून द्यावे यासाठी प्रहार मंगळवेढा तहसीलदारांना पाच गाई सुपूर्द करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिली.
दि.20 मार्चला दुधाचा दर 34 रु प्रति लिटर (३/५, 8.5) ला होता आता तोच 17 रुपये ते 18 रुपये झाला आहे.गेली 4 ते 5 महिने शेतकरी सर्व सहन करत आहे.मात्र सत्ताधारी व विरोधक यावरती राजकारण करत आहेत यावरती कसल्याही प्रकारचा तोडगा काढू शकले नाहीत.
एकतर कोरोनामुळे कोणत्याही पिकाला दर नसल्यामुळे तो आधीच हैराण झाला आहे त्यांच्या व्यथा कोणीही समजून घ्यायला तयार नाही.
सरकारने प्रत्यक्ष स्वतः सद्सदविवेक बुद्धीने विचार करावा यात केंद्र सरकार असो वा राज्य सरकार आपल्या राजकीय अट्टाहासापोटी याठिकाणी सर्वसामान्य माणूस, शेतकरी याठिकाणी भरडला जातोय ज्या ठिकाणी दारू पेट्रोल तसेच पाण्याची बॉटल अधिक किमतीला मिळते आणि त्याच ठिकाणी दूध जर 17 रु लिटर खरेदी केली जात असेल यासारखी लाजीरवाणी बाब कोणतीच नसेल.
ज्याठिकाणी संसदेत आणि विधानसभेमध्ये 80 टक्के आमदार-खासदार शेतकऱ्यांची मुले असतील आणि ते जर या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसतील, लक्ष देत नसतील तर तुमच्या सारखे नालायक औलादी तुम्हीच असाल राजू शेट्टी यांनी दूध बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलन केलं तेही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झाले परंतु याचा सुद्धा सत्ताधारी पक्षाने विचार केला नाही.
तसेच दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे तो अयशस्वी झाला
एवढे सर्व होऊन सुद्धा दुधाचे रेट वाढण्याऐवजी त्यामध्ये 1 रुपयांनी घट झाला आता दुधाचा दर 17 रुपये झाला तरी सरकार शांत का ?? शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का याची तर सरकार वाट पाहत नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय
येत्या 15 ऑगस्टला माननीय तहसीलदार स्वप्नील रावडे साहेब तहसील विभाग मंगळवेढा यांच्याकडे सकाळी 8 वाजता प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार युवा अध्यक्ष संतोष पवार सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी , संपर्क प्रमुख जमीर शेख, अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी,प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष सचिन गरंडे , अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या उपस्थतीत पाच गाई सुपूर्द करणार असल्याचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी निवेदन देताना सांगितले आहे यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे बोराळे विभागप्रमुख अमोगसिद्ध काकणकी, विभाग प्रमुख महेश बंदाई, महेश तळ्ळे , बाबा इनामदार, आप्पा राया काकनकी, नागनाथ म्हमाने , अमृत पवार, नवनाथ शिरसटकर, बाबुराव तोरणे , आनंद घुंगे ,नाना आसबे, फैय्याज मुलानी, राजू पाटील, रोहित आनंदपुरे , तसेच प्रहारचे इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
‘Prahar’ will give five cows to tehsildars for milk price hike Prahar Janashakti Paksha taluka president Rajkumar
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज