मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थोन महाअभियान योजनेतून दामाजी चौक ते सरकारी धान्य गोडाऊन पर्यंत भुयारी गटारीचे काम झाले
हे काम करीत असताना दहा फुटापेक्षा जास्त खोदकाम झाले त्यामुळे त्या ठिकाणी मुरूम तिनशे ब्रास निघाला तो भरपूर मुरूम हा नगरपालिकेला न कळवता किंवा न जमा करता
ठेकेदाराने परस्पर विकला व काही मुरूम स्वतःच्या शेतामध्ये नेऊन टाकला त्यामुळे शासनाचा लाखो रुपये हा ठेकेदाराने तोटा केला.
रॉयल्टी बुडवली या विरोधात ‘प्रहार’ने आवाज उठविला व प्रशासनातील अधिकारी हे मॅनेज आहेत ठेकेदारला हे सिद्ध करून दाखवले.
मोकाट फिरत असलेल्या ठेकेदारावर मुख्याधिकारी कोणतीच कारवाई का करत नाही हा प्रश्न आता मंगळवेढा शहरातील नागरिकांना पडला आहे म्हणून या विरोधात मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण प्रहारणे सुरू केले आहे.
काल या आंदोलनाचा तिसरा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार अशी भूमिका प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
या उपोषण स्थळी काल दिवसभर मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी भेट देऊन चेकअप केले परिस्थिती गंभीर होऊ शकते असे डॉक्टरांनी उपोषण करत्यांना सांगितले जर काही बरे वाईट झाले.
तर मंगळवेढा तहसीलदार जबाबदार राहतील असे डाॅक्टर यांना सांगितले परंतु उपोषणकर्त्यांची भूमिका ठाम आहे हे आंदोलन सुरूच ठेवणार असा त्यांनी निर्णय घेतला आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेचे अधिकारी मॅनेज आहेत त्यामुळे हे लगेच लक्ष देऊ शकत नाहीत मंगळवेढा नगरपरिषदेच्या ठेकेदारांनी आतापर्यंत निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत या विरोधात प्रहार संघटना आवाज उठवित आहे.
या उपोषणामध्ये प्रहारचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, जिल्हा उपाध्यक्ष शिद्राया माळी, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, देवदत्त पवार, संतोष यादव, सतीश जावळे, सर्जेराव पाराद्धे, युवराज टेकाळे, अनिल दोडमिसे, राम मेटकरी ,अंकुश सकट,
पांडुरंग हेंबाडे ,अर्जुन गायकवाड उपस्थित आहेत जर अधिकाऱ्यांनी कोणताच निर्णय काय नाही घेतला तर प्रहार चे कार्यकर्ते हे मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या वरती जाऊन आंदोलन करणार आहे अशी भूमिका बाहेरचे समाधान हेंबाडे यांनी घेतली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज