मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात लॉकडाऊन 4 लागू केला असला तरी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील बैलगाडी शर्यतीची घटना ताजी असताना पुन्हा तालुक्यातील उदनवाडी येथे बैल व घोडागाडी शर्यतीचा सराव व शर्यत लावण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार १९ रोजी उघडकीस आला असून पोलिसांनी ६ जणांसह इतर इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून बैलजोडी व घोडाजोडी शर्यतीच्या स्पर्धा अगर शर्यत घेण्यास प्रतिबंध केला असताना लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात उदनवाडी, बुद्धेहाळ व झापाचीवाडी ता.सांगोला येथील 6 जणांसह इतर इसमानी मिळून उदनवाडी गावाच्या बुध्देहाळ कॅनॉल शेजारी शेतातील मोकळ्या शिवारात पाच बैल व घोडाजोडी च्या गाड्या हातात चाबूक व काठ्या घेऊन सराव करण्याच्या तयारीत उभे होते.
दरम्यान या सराव व शर्यतीची गोपनीय माहिती पो.नि.राजेश गवळी यांना मिळाल्याने सपोनि प्रशांत हुले पो. ना. हजरत पठाण , पो. ना. नागेश निंबाळकर पो कॉ गणेश कुलकर्णी सदर ठिकाणी अचानक गेले असता पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या विजय आलदर यास पकडले यावेळी सपोनि हुले यांनी त्याच्याकडे इतर साथीदारांची नावे विचारपूस केली असता धनाजी सरगर , साईनाथ सरगर , बापूराव सरगर व नवनाथ वलेकर (रा. उदनवाडी) व भिमराव लवटे (रा. बुद्धेहाळ ता. सांगोला) असल्याचे त्यांने सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आम्ही सर्वजण मिळून बैल व घोडागाडी शर्यतीचा सराव करण्यासाठी व शर्यत लावण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून शर्यतीच्या रिकाम्या गाड्या ताब्यात घेतल्या. याबाबत पो.ना हजरत पठाण यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ६ जणांसह इतर इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
—————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज