टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गातील निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या १२०८ संस्थांना २० डिसेंबपर्यंत ब्रेक लागला आहे.
कोरोनामुळे दीड वर्ष सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली, मात्र तोपर्यंत पावसाळ्यामुळे सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.
ऑक्टोबरमध्ये प्रक्रिया सुरू झाली, गेले दोन महिने अनेक संस्थांच्या निवडणूका पार पडल्या. तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होत असून, २० डिसेंबरला मतमोजणी होत आहे.
डिसेंबर थंडी घेऊन येणार!
नोव्हेंबरच्या मध्यात सुटलेल्या गार वाऱ्याने मुंबईसह राज्यात किमान तापमानाचा पारा खाली घसरला आणि राज्याला हुडहुडी भरली. मात्र, त्यानंतर दाटून आलेल्या आभाळामुळे थंडीने काढता पाय घेतला;
परंतु, आता पुन्हा एकदा ईशान्यसह उत्तर दिशेकडून विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात सातपुड्याच्या खिंडीतून दाखल होणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात डिसेंबरचा पहिला आठवडा गारेगार होणार आहे.
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे. जळगाव, नाशिक जिल्ह्यासहित संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात ३० नोव्हेंबरपासून किमान तापमान हे सरासरीपेक्षा २- ४ अंशांनी घसरून साधारण ८-१० अंशांदरम्यान राहील.
दि.७ डिसेंबरपर्यंत साधारण थंडी राहील. कोकणातील पुढील चार दिवस वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज