मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती सोमनाथ आवताडे यांनी सुरू केलेल्या डाळींब सौदयामुळे शेतकऱ्यांना उच्चांकी दर मिळू लागला आहे.शुक्रवारी झालेल्या सौदयामध्ये सप्तश्रृंगी ट्रेडिंग कंपनी या आडतीवर बावची येथील शेतकरी भिमराव नारायण येडवे यांच्या डाळींबास प्रति किलो १५१ रु भाव मिळाल्याने सचिव सचिन देशमुख यांनी येडवे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मार्केट सप्तश्रृंगी ट्रेडिंग कंपनीचे मालक अमोल चव्हाण,मंगळवेढयाचे प्रबोधनकार शिक्षक दत्तात्रय येडवे,सतिश लेंगरे व अन्य व्यापारी उपस्थित होते.
भिमराव येडवे यांनी आपल्या डाळींब बागेस स्वाईल टच अॅग्रो ची सेंद्रीय खते व औषधे यांचा वापर केल्याने दर्जेदार व गुणवतापूर्ण डाळींब बाजारात आणली आहेत.सदर डाळींब शरद काळे , इम्रान बागवान व मुजीब बागवान यांनी खरेदी केली.
शेतीमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल डि.सी.सी बँकेचे मा.व्हा चेअरमन बबनराव आवताडे,दामाजी शुगरचे चेअरमन समाधान आवताडे,सभापती सोमनाथ आवताडे,जि.प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,सभापती प्रेरणा मासाळ यांनी येडवे यांचे कौतुक केले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज