mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उमेदवारांनो! पंढरपूर-मंगळवेढ्यात राजकीय सभेंच्या परवानगीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 31, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सभेसाठी नियमांचे बंधने घालून परवानगी देण्यात आली आहे.

मात्र जिल्ह्यात इतरत्र सभा, मोर्चा, मिरवणुका,संमेलने, यात्रा, मेळावे, कार्यक्रम घेण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहे. दि.१५ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

या कालावधीत मॉल्स सभागृहे आणि रेस्टॉरंट बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास हॉटेल्स, रेस्टॉरंटही बंद करण्यात येतील, तसेच त्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामधील मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या सभेसाठी आणि प्रचारासाठी आदेश लागू असणार नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वंतत्र आदेश निर्गमित केले आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या उद्देशाने कोणत्याही राजकीय मेळाव्यास ५० व्यक्ती किंवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के यापैकी जी कमी असेल इतक्या क्षमतेत बंदीस्त जागेवर एकत्र येण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

तसेच उघड्या जागेवर २०० किंवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के यापैकी जी कमी असेल इतक्या क्षमतेतच लोकांना कोव्हीड १९ बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन सुरक्षित शारिरिक अंतर, मास्क व तापमान मोजमाप करणारी यंत्र , सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास जागेच्या मालकास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येणार आहे. रॅली, कॉर्नर सभा घेण्यासाठी नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

ही शिथिलता केवळ मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या सभेसाठी राहणार आहे , असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकप्रचारसभा

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी; वायचळ यांची बदली

सोलापूर ब्रेकिंग! 'या' गावच्या जिल्हा परिषद सदस्याचे निधन

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..